Nashik Crime: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने मुलांसह उचलले टोकाचे पाऊल

सिन्नर तालुक्यातील मोहची घटना; तिघांना अटक, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime NewsSaam Tv

नाशिक - सिन्नर (Sinnar) तालुक्यातील मोह गावालगत असलेल्या पाझर तलावात तीस वर्षीय महिलेसह तिच्या दहा वर्षांची मुलगी व आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शनिवारी सकाळी 11 वाजेपासून हे तिघेही घरातून बेपत्ता झाले होते. या प्रकरणी मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून महिलेच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासू-सासऱ्यांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Nashik Crime News)

Crime News
Beed News : दसरा मेळाव्यासाठी वसूल केली जातेय खंडणी? शिंदे गटाचा नवा आरोप

सिन्नर - नाशिक (Nashik) महामार्गावरील मोह येथील ज्योती होलगीर या मुलगी गौरी आणि मुलगा साई यांच्यासह शनिवारी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे सासरे पांडुरंग कारभारी होलगीर यांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी होलगीर वस्ती जवळ असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यावर या तिघांचेही मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. (Nashik News Today)

स्थानिक तरुणांच्या मदतीने तिघांचे पाण्याबाहेर काढून सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या तिघांनाही मयत घोषित केले. दरम्यान मृत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com