नाशिक: पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोटारसायकल स्वाराचा चिरला गळा!

मोटारसायकल स्वाराच्या गळ्याला 20 टाके पडले
Nashik Hospital
Nashik Hospitalअभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक: मकर संक्रांतीचा सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सकाळीच नाशिककरांना केले होते. परंतु पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजामुळे मोटारसायकल स्वाराचा गळा चिरल्याची घटना येवल्यातून समोर आली आहे. (Latest Nashik News In marathi)

येवला शहरातून अंगणगावला निघालेल्या मोटारसायकल स्वाराचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला आहे. गळा चिरला गेल्यानं मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी मोटारसायकल स्वाराला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Nashik Hospital
अकोला: बोअरवेल मशीनचा शॉक लागून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यु

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल स्वाराच्या गळ्याला 20 टाके पडले आहेत. नायलॉन मांजावर बंदी असतांनाही येवल्यात चोरीछुपे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर, आजपासून येवल्यात 3 दिवसांच्या पतंगोत्सवाला सुरुवात झाली असतानाच, पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजाने एक जण जखमी झाला आहे.

दरम्यान, मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ आज म्हणाले होते की, "मकर संक्रांतीचा सण म्हंटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग (Kite) उडवत असतात. मात्र आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पतंग उडवताना मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर तरुणांकडून होत असतो नायलॉन मांजामुळे पशु-पक्ष्यांना तसेच मानवी जीवीताला देखील धोका असल्याने नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले होते.

"संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतो, मात्र देशभरात कोरोना (Corona) संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सण साजरे करत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, मास्कचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे" असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com