नाशिक पोलिसांची 'हेल्मेट सक्ती'साठी नामी शक्कल; दंडात्मक कारवाई ऐवजी...

नाशिक शहरातील (Nashik City) रस्त्यांवर आजपासून विनाहेल्मेट (Helmet Compulsory In Nashik) दुचाकी चालवाल तर सावधान.
नाशिक पोलिसांची 'हेल्मेट सक्ती'साठी नामी शक्कल; दंडात्मक कारवाई ऐवजी...
नाशिक पोलिसांची 'हेल्मेट सक्ती'साठी नामी शक्कल; दंडात्मक कारवाई ऐवजी...Saam Tv

नाशिक शहरातील (Nashik City) रस्त्यांवर आजपासून विनाहेल्मेट (Helmet Compulsory In Nashik) दुचाकी चालवाल तर सावधान. कारण नाशकात आजपासून हेल्मेटसक्तीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून आजपासून शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. आजपासून शहरात दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली असून या मोहिमेचं वैशिष्ट्यं म्हणजे या मोहिमेअंतर्गत दंडात्मक कारवाई ऐवजी चालकांचं समुपदेशन करण्यात येणार आहे.

नाशिक पोलिसांची 'हेल्मेट सक्ती'साठी नामी शक्कल; दंडात्मक कारवाई ऐवजी...
कुस्तीपटूचा मान मुरगळल्याने मैदानावरच तडफडून मृत्यू

शहरात 15 ऑगस्टपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल सक्ती करण्यात आल्यानंतर अनेक दुचाकीचालक केवळ पेट्रोल भरण्यापुरता हेल्मेटचा वापर करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहीमेसोबतच आजपासून रस्त्यावर हेल्मेटसक्तीसाठी पोलिसांनी 4 ठिकाणी नाकाबंदी केली असून विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय.

विना हेल्मेट आढळणाऱ्या दुचाकीचालकांना पोलीस गाडीतून ट्रॅफिक पार्कमध्ये पाठवण्यात येत आहे. ट्रॅफिक पार्कमध्ये 2 तास त्यांचं समुपदेशन करण्यात येईल. त्यानंतर या समुपदेशनाचं प्रमाणपत्र दाखवल्यानंतरचं दुचाकी चालकांना त्यांची दुचाकी परत मिळणार आहे. त्यामुळे शहरात हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com