नाशिककरांना यंदा गणपती बाप्पाही ऑनलाईन मिळणार

बाजारातील गर्दी टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
नाशिककरांना यंदा गणपती बाप्पाही ऑनलाईन मिळणार
नाशिककरांना यंदा गणपती बाप्पाही ऑनलाईन मिळणारअभिजीत सोनावणे

नाशिक - नाशिककरांना यंदा गणपती बाप्पा Ganpati Bappa देखील ऑनलाईन Online पद्धतीने घरपोच मागवता येणार आहे. कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर बाजारातील गर्दी टाळण्यासाठी नाशिक Nashik महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी पालिकेने शाडू मातीच्या गणेश मूर्ती Ganesh Idol साकारणाऱ्या मूर्तीकारांना स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले असून या ठिकाणी नाशिककर अगदी घरी बसून नाशिक महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने पर्यावरणपूरक अशा गणेश मूर्ती बुक करू शकतील आणि मूर्तीची घरपोच डिलिव्हरीही मागवू शकणार आहेत.

हे देखील पहा -

त्याशिवाय ऑफलाईन खरेदीचाही पर्याय गणेश भक्तांसाठी खुला आहे. दरवर्षी पीओपीच्या मूर्तींमुळे नदीचे होणारे प्रदूषण लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला जात आहे. पीओपीच्या मूर्ती या तुलनेने स्वस्त असल्या तरी त्यामुळे होणारे नदीचे प्रदूषण, मागील वर्षापासून असलेले कोरोनाचे सावट आणि आगामी काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, या पार्श्वभूमीवर महापालिकेने बाजारातील गर्दी टाळण्यासाठी आणि नाशिककरांनाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ऑनलाईन बाप्पाची मूर्ती निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com