बच्चू कडू राजीनामा द्या; सुवर्णकार समाजाची मागणी
suvarnkar samaj demands bacchu kadu resignation

बच्चू कडू राजीनामा द्या; सुवर्णकार समाजाची मागणी

नाशिक : सुवर्णकार समाजाच्यावतीने आज (मंगळवार) राज्यमंत्री बच्चू कडू bacchu kadu यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदाेलनकर्त्यांनी बच्चू कडू राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करीत सराफ बाजारातील सोन्या मारुती चौक परिसर दणाणून साेडला. (nashik-suvarnkar-samaj-demands-bacchu-kadu-resignation-sml80)

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी येथील आडगावकर कुटुंबियांची घेतली होती. रसिका अडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी हिंदू सुर्वणकार समाजाबाबत मंत्री कडू यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने हे आंदाेलन करीत असल्याचे आंदाेलकांनी स्पष्ट केले.

नाशिक येथील रसिका अडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाला काही हिंदू संघटनांनी विरोध केला. त्यानंतर दाेन्ही कुटुंबीयांनी हा लग्न सोहळा रद्द केला हाेता. दरम्यान या लग्नास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला हाेता. त्यावेळी मंत्री कडू यांनी हिंदू सुवर्णकार समाजाबद्दल काही वक्तव्य केली. ही वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे सुवर्णकार समाजाचे म्हणणे आहे.

suvarnkar samaj demands bacchu kadu resignation
'पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातील चुका सुधारण्यासाठी मदत करु'

बच्चू कडू यांच्यामुळे सामाजिक स्वास्थय बिघडले आहे. त्यांचा वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज (मंगळवार) सुवर्णकार समाजाच्यावतीने सराफ बाजारातील सोन्या मारुती चौक परिसरात आंदाेलन करण्यात आले. यावेळी मंत्री कडू यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली suvarnkar samaj demands bacchu kadu resignation.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com