
नाशिककरांसाठी एक महत्वाची बातमी. नाशिक शहरात येत्या शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद (nashik water supply) राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक (Nashik) शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुकणे आणि गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी महावितरण वीज पुरवठा बंद ठेवणार असल्याने पाणी पुरवठा होणेही शक्य नाही. त्यामुळेच . त्यामुळे शनिवारी पाणीपूरवठा बंद (water supply) ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
शनिवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार येणार असल्याने संपूर्ण दिवस पाणी पुरवठाही होणार नाही. शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असून रविवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा हाेईल असे पालिकेने म्हटलं आहे.
शहरात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक करांना सतावणाऱ्या पाणी टंचाईतून यंदा मुक्ती होण्याची शक्यता आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) सद्यस्थितीत 95 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.