Ganesh Chaturthi: रहिमची झाली नवसपुर्ती, घरात बसवला गणपती...

Nashik News: रहिमची झाली नवसपुर्ती, घरात बसवला गणपती...
Nashik News
Nashik NewsSaam Tv

>> अजय सोनावणे

Nashik News:

हिंदु-मुस्लीम हा वाद नेहमीच होत असतो, मात्र मानवता धर्म हा खूप मोठा आहे. क्या अल्ला क्या ईश्वर सब एक है आणि ही मानवतेची शिकवण देणारा अवलीया तसाच आहे.

Nashik News
Honda ने आणली सूटकेस-डिझाइन मिनी 'ई-स्कूटर', कारमध्येही होईल फिट; किती आहे किंमत?

नाशिकमध्ये हिंदू मुस्लीम एकतेचं दर्शन घडलं आहे. येथे एका मुस्लीम तरुणाने आपल्या घरात गणपती बसवला आहे. या तरुणाचं रहिम शेख असं आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या येवला तालूक्यातील पुरणगाव येथिल रहिम शेख हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे. तो गादी विकण्याचा व्यवसायही करतो. लग्नानंतर त्याला तीन मुली झाल्या त्यानंतर त्याने गावातील गणपती मंदीरात जात नवस केला. मुलगा झाला तर पाच वर्ष घरात गणपती बाप्पाची स्थापना करेल.

Nashik News
Twitter (X) वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार, इलॉन मस्कने दिले संकेत...

यानंतर त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्यांनी आपल्या घरी गणपती बसवण्यास सुरुवात केली. यालाच आज चार वर्ष पुर्ण झाले असून पाचव्या वर्षी ब्राम्हणांच्या उपस्थित संध्याकाळच्या सुमारास गणेशाची घरात स्थापना करत विधिवत पुजा-अर्चा केली. एखाद्या मुस्लीम व्यक्तीने घरात गणपतीची स्थापना करणे हे अनेकांच्या भुवया उंचावणारे असले तरी त्याला त्याच्या कुटूंबातून आणि गावातून सर्व जण साथ देत असतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com