Nashik : बळजबरीने लॉज वर नेऊन तरुणीवर अत्याचार! पहा Video

शाळेत जाणाऱ्या पीडित मुलीला, तुला पप्पांनी घरी बोलावले आहे, असे सांगून कारमध्ये बसवत लॉजवर नेऊन तिच्यावर विनयभंग करण्यात आला.
Nashik : बळजबरीने लॉज वर नेऊन तरुणीवर अत्याचार! पहा Video
Nashik : बळजबरीने लॉज वर नेऊन तरुणीवर अत्याचार! पहा VideoSaamTv

सागर गायकवाड

नाशिक : नाशिकमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने लॉजवर नेत एका नराधमाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत जाणाऱ्या पीडित मुलीला, तुला पप्पांनी घरी बोलावले आहे, असे सांगून कारमध्ये बसवत लॉजवर नेऊन तिच्यावर विनयभंग करण्यात आला. रूममध्ये असताना मुली ने आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्या रूम मध्ये असणाऱ्या व्यक्ती ने दार वाजवले.

हे देखील पहा :

पीडित मुलीने दार उघडले असता त्या व्यक्तीला सांगितले की हे माझ्या बरोबर विचित्र पद्धतीने हात लावत आहेत. यावर सारवासारव करत आरोपीने पीडितेला पुन्हा शाळेजवळ सोडतो असे सांगून शाळेच्या परिसरात नेऊन सोडले. या घटनेननंतर पीडित मुलीने घरी येऊन आईला सर्व प्रकार सांगताच ही पूर्ण घटना उघड़कीस आली. मुलीच्या नातेवाईकांनी संशयित आरोपी दानिश खानला मारहाण केली त्यामुळे दानिशवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सं

Nashik : बळजबरीने लॉज वर नेऊन तरुणीवर अत्याचार! पहा Video
Beed : राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे : राजू शेट्टी

शयित दानिश खान विरोधात काल संध्याकाळी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पिडीत मुलीच्या कुटुंबियांच्या ओळखीतील व्यक्ती असल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com