राहुरी विद्यापीठातील तीन शास्त्रज्ञांना राष्ट्रीय पुरस्कार

राहुरी विद्यापीठातील तीन शास्त्रज्ञांना राष्ट्रीय पुरस्कार
राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा गौरवसाम टीव्ही

अहमदनगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख धुळे डॉ. मिलिंद अहिरे यांना भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचा डॉ. जी.एस. विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कृषी माहिती संवाद आणि विस्तार कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विस्तार शास्त्रज्ञाला देण्यात येतो. National award to three scientists from Rahuri University abn79

राहुरी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचा गौरव
Sindhudurg | चिपी विमानतळाचे आज उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर

या सोबतच कृषी महाविद्यालय, धुळे येथील डॉ. संदीप पाटील यांना भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचा यंग सायंटिस्ट पुरस्कार व उत्कृष्ट संशोधन पेपर सादरीकरणाबद्दल पुरस्कार देण्यात आला. तसेच सहाय्यक प्राध्यापक डॉ आनंद चवई यांना देखील उत्कृष्ट संशोधन पोस्टर सादरीकरणाबद्दल पुरस्कार देण्यात आला.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या राष्ट्रीय परिसंवादात उत्तर प्रदेश राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रवींद्र जैसवाल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. यावेळी भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष डॉ. यु. एस. गौतम, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए.के. सिंग यावेळी उपस्थित होते.National award to three scientists from Rahuri University abn79

Related Stories

No stories found.