धक्कादायक! राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोरांचा जीव धोक्यात

तापमानात प्रचंड वाढ असतांना पाण्यासाठी मोरांची वणवण भटकंती
Beed News
Beed NewsSaam Tv

बीड - राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराकडं (Peacock) पाहिलं जातं. मात्र याचं पक्षाचा राजा असणाऱ्या मोरांच्या जीविताशी, बीडचं (Beed) वनविभाग खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्याचा पारा 41 अंशा पेक्षा वर गेला आहे. उष्णतेने जिल्ह्यात कहर केला असून माणसांना बाहेर फिरणे अवघड झाले आहे. यातच वनविभागाने पक्षांसह प्राण्यांसाठी अभयारण्यात केलेले पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे मोरांसह पक्षांना आणि प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

हे देखील पाहा -

देशात मोरांसाठी प्रसिद्ध म्हणून बीडच्या पाटोदा तालुक्यातील नायगावच्या मयूर अभयारण्यकडे पाहिलं जातं. या मयूर अभयारण्य 3 हजारपेक्षा जास्त मोरं वास्तव्य करतात. तर मोरांसह इतर जवळपास हजारो वेगवेगळ्या जातीचे पक्षी देखील राहतात. त्याचबरोबर हरीण, काळवीट, नीलगाय, खोकड यासह अन्य प्राणी देखील वास्तव्य करतात.

Beed News
जहांगीरपुरी परिसरात मोठा फौजफाटा तैनात; आरोपींच्या अवैध मालमत्तांवर चालणार 'बुलडोजर'

हे मयूर अभयारण्य नायगाव परिसरात जवळपास 29.90 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. तर या क्षेत्रफळांमध्ये मुक्या प्राण्यांसाठी जवळपास 28 पाणवठे बनवण्यात आले आहेत. मात्र उन्हाळ्याच्या आणि उष्णतेच्या दिवसांमध्ये हे पाणवठे कोरडे ठाक पडले असून वनविभागाकडून मोरांसह वन्य प्राण्यांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वन विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता पक्षीप्रेमी, प्राणीमित्र आणि वन्यप्रेमींमधून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com