उस्मानाबादच्या गुरुजींना देशपातळीवरील आयसीटी पुरस्कार

कडदोरा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश खोसे यांना केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीकडून (CIT) देण्यात येणारा आयसीटी पुरस्कार (ICT Award) जाहीर झाला आहे.
उस्मानाबादच्या गुरुजींना देशपातळीवरील आयसीटी पुरस्कार
उस्मानाबादच्या गुरुजींना देशपातळीवरील आयसीटी पुरस्कारकैलास चौधरी

कैलास चौधरी

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील कडदोरा येथील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला केंद्र सरकारच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीकडून (CIT) देण्यात येणारा आयसीटी पुरस्कार (ICT Award) जाहीर झाला आहे. National level ICT award to Teacher In Osmanabad

हे देखील पहा -

उमेश खोसे असे या शिक्षकाचे नाव आहे. खोसे गुरुजी लोहारा तालुक्यातील जगदंबानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानदानाचे काम करतात. गुरुजींनी कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारे स्वयम् अध्ययनाची सवय लावून टेक्नोसॅव्ही बनवलं. जिल्हा परिषदेच्या शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उमेश खोसे यांनी दीक्षा ऍपचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांना स्वयम् अध्ययनाची गोडी लावली आहे.

कोरोना काळात त्यांच्या शाळेची वेबसाईट बनवून त्यांनी ऑनलाइन निकाल जाहीर केले. त्यामुळेच जिल्ह्यातील एकमेव ऑनलाइन निकाल देणारी शाळा होण्याचा मान देखील त्यांच्या शाळेस प्राप्त झाला आहे.

उस्मानाबादच्या गुरुजींना देशपातळीवरील आयसीटी पुरस्कार
मृणाल गांजाळे-शिंदे यांना राष्ट्रीय तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार जाहीर; राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार

विविध ऍप्स, व्हिडिओजच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. याशिवाय त्यांनी शाळेच्या परिसरात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचन कट्टा तयार करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली आहे.

शालेय स्तरावरील अत्यंत तोकड्या यंत्र सामग्रीचा योग्य वापर करून खोसे गुरुजींनी केलेल्या या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील तीन तंत्रस्नेही शिक्षकांना जाहीर केलेल्या पुरस्कारात खोसे गुरुजींचे नाव आहे. गुरुजींच्या रूपाने मराठवाड्याला आणि उस्मानाबाद जिल्ह्याला पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावरील हा बहुमान मिळाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com