विधानपरिषद निवडणुकीत २१ कोटी रुपयांत एका पक्षाची तीन मतं फोडली, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

विधानपरिषद निवडणुकीत आमदारांच्या फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, कारण...
Amol Mitkari
Amol Mitkari Saam Tv

बारामती : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad election) भारतीय जनता पक्षाने विजयाचा झेंडा फडकवला. महाविकास आघाडी सरकारचा बालेकील्ला असतानाही दवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वाखाली भाजपने सरशी केली. परंतु या निवडणुकी दरम्यान आमदारांच्या फोडाफोडीचे राजकारण सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांकडून खबरदारी घेतली जात असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, विधान परिषद निवडणुकीत २१ कोटी रुपयांत एका पक्षाची तीन मतं फोडली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. ते बारामतीत पुणे-बारामती सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होते.

Amol Mitkari
पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहील; संरक्षणमंत्र्यांचा पाकला सज्जड दम

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. २७ मतांसाठी १६१ कोटी, आपल्या जमिनीची किंमत पाच लाख आहे. चार एकर विकली तरी २० लाख येतील. विधान परिषद निवडणुकीत एका एका उमेदवारासाठी घोडेबाजार झाला. आमदारांना फोडण्यात आलं, असा आरोप मिटकरी यांनी बारामतीत पुणे-बारामती सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात केला.

बारामतीत एका कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना मिटकरी म्हणाले, नुकत्याच विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या. एका पक्षाची तीन मतं फुटली आणि ती मतं २१ कोटी रुपयांत फोडली. या पेशांची गोळाबेरीज केली तर २७ मतांसाठी १६१ कोटी रुपये होतात. आपल्या जमिनीची किंमत पाच लाख आहे,चार एकर विकली तरी २० लाख येणार. एका एका उमेदवारासाठी घोडेबाजार झाला. आमदारांना फोडण्यात आलं.

Amol Mitkari
'त्या' आमदारांवर कारवाई झाली नाही तर पक्षाबाबतचा निर्णय घेऊ; चंद्रकांत हंडोरेंचा काँग्रेसला इशारा

आताही ऑफर सुरु आहेत. या गटाचे अध्यक्ष व्हा, एक मर्सिडीज घ्या, दोन लाख रुपये महिना घ्या, दोन कोटी रोख घ्या, अशी ऑफर पण सुरु आहे. सध्याच्या इतक्या श्रीमंतीच्या निवडणुकीमध्ये विधानपरिषदेसारख्या जबाबदार सभागृहामध्ये मला एक रुपयाही खर्च न करता आमदार होता आलं, ही पुण्याई फक्त अजित पवार यांची आहे. त्यामुळे मी या लोकांसोबत बसतो, असंही मिटकरी म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com