नवी मुंबईत शिवसेना पक्षात मोठी फूट ? भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण

शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेतील कार्यकर्त्यामध्ये दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हीच स्थिती नवी मुंबईमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
Shivsena And navi Mumbai
Shivsena And navi Mumbai Saam Tv

सिद्धेश म्हात्रे

नवी मुबंई : एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. तर काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेतील कार्यकर्त्यामध्ये दोन गट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हीच स्थिती नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) देखील पाहायला मिळत आहे. ( Navi Mumbai Shivsena News In Marathi )

Shivsena And navi Mumbai
फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकत होते, पण...; चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यामागील कारण

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता नवी मुंबईतील शिवसेनेचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या शिवसेनेचे स्वतःचे ३८ आणि इतर पक्षातून सेनेत आलेले १० असे एकूण ४८ नगरसेवक आहेत. मात्र या ४८ पैकी ३० पेक्षा अधिक नगरसेवक शिंदे गटात सहभागी झालेत. नवी मुंबईतील विजय चौगुले यांचा गट आणि विजय नाहटा यांचा गट शिंदेंसोबत जाणार आहेत. असे झाल्यास नवी मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेत मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅकफूटवर पडलेल्या भाजपाच्या गोटात मात्र यामुळे आनंदाचे वातावरण आहे.

Shivsena And navi Mumbai
भाजपप्रणित राज्य सरकारचा 'तो' निर्णय मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणारा, नाना पटोले म्हणाले...

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यामांशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तीन प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. 'काल ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवंल शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं', असं म्हणत शिंदेंवर निशाणा साधला.

'मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही. जर त्यावेळी मला दिलेला शब्द पाळला असता तर काल जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं. भाजप किंवा शिवसेनेचा (Shivsena) मुख्यमंत्री झाला असता. मात्र, त्यावेळी भाजपने (BJP) का नकार दिला हा माझ्यासह जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. पाठीत वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला. पण, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com