Hapus Mango: आंब्याला हापूस आंबा म्हणून विकाल तर दाखल होईल गुन्हा

आंब्याला हापूस आंबा म्हणून विकाल तर दाखल होईल गुन्हा
Hapus Mango
Hapus MangoSaam tv

सिद्धेश म्‍हात्रे

नवी मुंबई : कोकणचा हापूस असल्याचे सांगत परराज्यातील आंबा विक्री केला जात असतो. परंतु, असा आंबा विकणाऱ्या व्यापाऱ्यांना आता असे करणे महागात पडणार असून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अश्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. (Maharashtra News)

Hapus Mango
Jalgaon News: हृदयद्रावक..आई, वडिलांसाठी पिण्यासाठी पाणी आणायला गेला तो परतलाच नाही; युवकाचा दुर्दैवी मृत्यू

मार्च महिना सुरु झाला असून आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात आंब्याची आवक वाढली असून महाराष्ट्रातील कोकणासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तेलंगणा या राज्यातूनही आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. किरकोळ बाजारात अनेक व्यपारी परराज्यातून आलेला आंबा हा कोकणचा हापूस आंबा म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक करत असतात.

हापूस आंब्‍यावर असेल विशिष्‍ट टॅग

ग्राहकांची होणारी हीच फसवणूक थांबविण्यासाठी केंद्र सरकारने कोकणच्या हापूस आंब्याला जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग दिला आहे. यामुळे कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली सर्रासपणे इतर राज्यातील आंबा विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. एपीएमसी फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी देखील किरकोळ बाजारात असे प्रकार घडत असून यापुढे असे केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com