राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना, शिवसेना नेत्यांविरोधात लावणार फिल्डिंग?

Navneet Rana : माध्यमांसोबत संवाद साधल्यानंतर आज राणा दाम्पत्य मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांची तक्रार करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
राणा दाम्पत्य दिल्लीकडे रवाना, शिवसेना नेत्यांविरोधात लावणार फिल्डिंग?
Navneet Rana Ravi Rana Latest News Updates, Hanuman chalisa controversy Saam TV

मुंबई: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार नवनीत राणा (Ravi Rana) शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहेत. आम्ही कोर्टाचा अवमान केला नाही. पोलीस ठाणे, तुरुंगात आमच्याशी गैरव्यवहार झाला. राज्य सरकारने आमच्यावर अन्याय केला असून लोकप्रतिनिधीला चुकीची वागणूक दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात (CM Uddhav Thakarey) तक्रार करणार असल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय. माध्यमांसोबत संवाद साधल्यानंतर आज राणा दाम्पत्य मुंबई पोलीस आणि संजय राऊत यांची तक्रार करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

Navneet Rana Ravi Rana Latest News Updates, Hanuman chalisa controversy
तुरुंगात आम्हाला गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक; दिल्लीतून न्याय मिळवणार : रवी राणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेणार भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. "देशाचे गृहमंत्री महिलांचा सन्मान करणारे आहेत. ते आमची तक्रार ऐकून घेतील असा विश्वास आम्हाला आहे. राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीची तक्रार आम्ही करणार आहोत. अजित पवार (Ajit Pawar) हेच मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यातील व्हिडिओ संदर्भात बोलणं पटलेलं नाही. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची व्यवस्थित माहिती घ्यावी. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील रात्री साडेबारानंतरचं फुटेज अजित पवार यांनी तपासावं आणि सत्य परिस्थिती लोकांसमोर आणावी असं आमचं आवाहन आहे", असं आमदार रवी राणा म्हणाले.

संविधानानं दिलेल्या अधिकारानुसारच आम्ही आंदोलन केलं होतं. पण मुख्यमंत्र्यांची दडपशाही सर्व जनतेनं पाहिली आहे. एका महिला खासदार आणि आमदाराला तुरुंगात जी वागणूक दिली ती अतिशय वाईट आहे. तुम्हाला जर वाटत असेल सांताक्रूझमधील तुरुंगातील रात्री साडेबारानंतरचे फुटेज सर्वांसमोर आणावेत. आमच्यावर ज्या पद्धतीचा अन्याय झाला आहे याची तक्रार आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे करणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत दिल्लीतच राहणार, कारवाई केल्याशिवाय परतणार नाही, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा सुद्धा आक्रमक झाल्या आहेत. बाहेर आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला आमची काय चूक होती असा सवाल करत, "तुम्ही आम्हाला हनुमान चालीसाच्या कारणावरुन अटक करत असाल तर मी चौदा दिवसंच काय 14 वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे." असं म्हटलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचारा प्रकरणी सुरू असलेल्या केसेसवर आम्ही केंद्रीय यंत्रणांकडून माहिती घेणार आहोत. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार असून त्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार असल्याचं राणांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.