नवनीत राणांचा गाण्याच्या तालावर ठेका; गरब्यातून प्रबाेधन

नवनीत राणांचा गाण्याच्या तालावर ठेका; गरब्यातून प्रबाेधन
navneet rana file photo

अमरावती : हे आदिशक्ती-आदिमाया असु दे सर्व भक्तांवरती तुझी छत्रछाया अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा Navneet Ravi Rana यांनी नवरात्राेत्सव निमित्त दुर्गा देवीस केली. संपूर्ण जग-देश-राज्य व आपल्या जिल्ह्यातुन कोरोना नाहीसा व्हावा व शेतकरी-शेतमजूर, व्यापारी- उद्योजक, गृहिणी -विदयार्थी व सर्व नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी शांती लाभावी अशी मागणी केली. खासदार राणा यांनी शहरातील विविध दुर्गा मंडळांना भेटी देऊन देवीची मनोभावे प्रार्थना केली. navneet-rana-garba-dance-amravati-navratri-news-sml80

navneet rana file photo
मेथी १३० रुपयाला; गृहिणींना फुटला घाम

यावेळी खासदार नवनीत राणा यांनी भाविकांसमवेत रास गरबा खेळून गरब्याचा आनंद लुटला. यावेळी भगिनींचा उत्साह वाढविला. नवरात्रचे नऊ दिवस चैतन्याचे उत्साहाचे असून देवी भक्तीसोबत नागरिकांनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान शासन नियमांचे पालन करून कोरोनापासून आपला बचाव करावा असे आवाहनही खासदार राणा यांनी यावेळी उपस्थित भाविकांना केले. भाविकांनी काेविड १९ चे लसीकरण करुनच उत्सवात सहभागी घ्यावे असेही राणांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.