शेतक-यांसाठी जे कधीच घडलं नाही ते आज झालं : नवनीत राणा

आज पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कृषी कायदाबाबत माेठी घाेषणा केल्यानंतर त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
navneet rana
navneet rana

अमरावती : कृषी कायदा मागे घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र माेदी (narendra modi) यांचा अहंकार तुटला असे म्हटले जात आहे. विराेधकांनी हे समजून घेतले पाहिजे येथे माेदींचा विजय अथवा पराजय याचा विषय येत नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घेतलेल्या निर्णायामुळे त्यांची जनमाणासत दसपट उंची वाढली आहे. जनतेसाठी आणि शेतक-यांसाठी ते किती समर्पित आहेत हे आज दिसून आलेले आहे अशी भावना अमरावती (amravati) येथे खासदार नवनीत राणा (navneetrana) यांनी व्यक्त केली आहे.

navneet rana
तिरंदाजीत भारताच्या ज्योतीस 'सुवर्ण'; कोरियाचा १ गुणाने पराभव

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदा मागे Farm Laws To Be Repeal घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी ही तात्पूरती व्यवस्था असल्याचे म्हटलं. तसेच या निर्णयावरुन विराेधक पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा अहंकार तुटल्याचे बाेलू लागले आहेत. त्यावर खासदार नवनीत राणा यांनी माेदींचा जय-पराजयचा हा विषय नाही असे म्हटलं.

राणा म्हणाल्या लाेकतंत्राच्या मंदिरात यापुर्वी कधीच काेणता कृषी कायदा मागे घेण्यात आला नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र माेदींनी प्रामाणिकपणे मी विशिष्ट वर्गाला समजू शकलाे नाही म्हणून कायदा मागे घेत असल्याचे नमूद केले. माेदींच्या या निर्णयाचे संपुर्ण देशातील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या व शेतक-यांच्यावतीने आभार मानते असे राणा यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com