Navneet Rana: "लिव्ह इन रिलेशनशिप काय असतं? मी ऐकल नव्हतं", नवणीत राणा नेमकं काय म्हणल्या?

Navneet Rana News: आजकाल मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे. ही कुठली परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आली आहे? असे नवनीत राणा म्हणाल्या.
Navneet Rana News
Navneet Rana Newssaam tv

Navneet Kaur Rana: आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी शहरात पाठवतात, मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह इनमध्ये राहतात, असे विधान खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये केले आहे. व्हॅलेंटाईन विकच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराज प्रकट दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की 'लिव्ह इन रिलेशनशिप काय असतं? मी आतापर्यंत कधी ऐकल नव्हतं, आजकालच्या तरूण-तरुणींकडून याविषयी ऐकत आहे, ही आपली संस्कृती नाही, असेही यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या. (Latest Marathi News)

Navneet Rana News
Devendra Fadnavis : काय प्रॉब्लेम आहे?... अजित पवारांच्या 'त्या' टीकेवर देवेंद्र फडणवीस थेटच बोलले!

आई वडील मुला-मुलींना शिक्षणासाठी शहरात पाठवतात, मात्र ते भाड्याच्या घरात लिव्ह इनमध्ये राहतात. आजकाल मुलं-मुलांसोबत आणि मुली-मुलींसोबत लग्न करत आहे. ही कुठली परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये आली आहे, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

Navneet Rana News
Thane Election News: ठाणे निवडणुकीसाठी ठाकरे गट अलर्ट; फुटणाऱ्या नगरसेवकांसाठी खास Video शेअर करत दिला इशारा

आई-वडीलांनी आपल्याला रक्ताचं पाणी करून स्वतंत्र बनवलं आणि आपण पैसे जास्त झाले म्हणून डोक्याच्यावर जायचं, ही आपली संस्कृती नाही. आई वडील त्यांचे कर्तव्य पार पाडतात त्यामुळे मुलांनी आपलं कर्तव्य पार पडलं पाहिजे असा सल्ला देखील राणा यांनी यावेळी तरुणांना दिला. (Tajya Batmya)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com