एसटी संप : ठाकरे- परब फेल; पवारांमुळे गाेड बातमी मिळेल : राणा

तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले.
एसटी संप : ठाकरे- परब फेल; पवारांमुळे गाेड बातमी मिळेल : राणा
Navneet RanaSaam Tv

अमरावती : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (msrtc) प्रश्नात लक्ष घातलेने आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता एक चांगला संदेश सर्वांपर्यंत मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी आशा बाळगवू या असे खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी नमूद केल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व मंत्री अनिल परब (anil parab) हे सरकारमध्ये फेल गेल्याची टीका खासदार राणा यांनी केली.

Navneet Rana
जळगाव DCC त राेहिणी खडसेंचा दणदणीत विजय; 'महाविकास' ची सरशी

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप ताेडगा निघालेला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब हे सरकारमध्ये अपयशी ठरल्याचे सिद्ध हाेत आहे. तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले.

शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातले आहे. त्यामुळे आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. एक चांगला संदेश मिळेल व एसटी कर्मचारी आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com