"नवाब मलिक एक जबाबदार मंत्री" - अतुल लोंढे

“नवाब मलिक एक जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी केलेलं वक्तव्य पुराव्यानीशी केलेल असेल." असं म्हणत कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मलिकांची पाठराखण केली आहे.
"नवाब मलिक एक जबाबदार मंत्री" - अतुल लोंढे
"नवाब मलिक एक जबाबदार मंत्री" - अतुल लोंढेSaam Tv

नागपुर: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीसह भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप करतायत. आज त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच ड्रग्स प्रकरणी गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपने मलिकांचा निषेध केला. याबाबत कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नवाब मलिकांची पाठराखण केली आहे. ("Nawab Malik a responsible minister" said Atul Londhe)

हे देखील पहा -

अतुल लोंढे म्हणाले की, “नवाब मलिक एक जबाबदार मंत्री आहेत, ते राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांनी केलेलं वक्तव्य पुराव्यानीशी केलेल असेल, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांची EOW, ACB अशा महत्त्वाच्या एजंसीजकडून सखोल चौकशी करावी, कारण हा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे, कुणीही कायद्याच्या वर नाहीत.” असं म्हणत त्यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

"नवाब मलिक एक जबाबदार मंत्री" - अतुल लोंढे
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या उर्वरीत शेतकऱ्यांना मदत कधी?

गॅस दरवाढीबद्दल बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, एकीकडे उज्वला गॅस सुरू करायचा, रॉकेल बंद करायचा आणि नंतर गॅस दरवाढ करायची, ही दरवाढ सर्वसामान्यांचं जीवन असह्य करणारी आहे, या सरकारनं अच्छे दिनच्या नावावर सर्वसामान्यांचं कंबरडे मोडले आहे, अशी टीकाही त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com