देशात कायद्याचं राज्य आहे का? नवाब मलिकांचा सवाल

ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
देशात कायद्याचं राज्य आहे का? नवाब मलिकांचा सवाल
देशात कायद्याचं राज्य आहे का? नवाब मलिकांचा केंद्रावर निशाणा SaamTv

मुंबई : या देशात कायद्याचं राज्य आहे की, केंद्रातील राज्यकर्त्यांनी या देशात नवीन कायदा केला आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आणि वकीलांना CBI ने संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानाबाहेर ताब्यात घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हे देखील पहा -

अनिल देशमुख यांची मुलगी, सुन, जावई आणि वकील वरळी येथील निवासस्थानाबाहेर येत असताना CBI ने देशमुख यांचे वकील व जावई यांना ताब्यात घेतले.

देशात कायद्याचं राज्य आहे का? नवाब मलिकांचा केंद्रावर निशाणा
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

एकंदरीत ही सर्व कारवाई करण्यात आली ती बेकायदेशीर किंवा नियमाला धरून नाही त्यामुळे सीबीआयने तात्काळ याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com