Pandharpur Accident News: राष्ट्रवादीच्या २६ वर्षीय कार्यकर्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर शोककळा

पतीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना ट्रकचा धक्का लागून खाली पडलेल्या २६ वर्षीय राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pandharpur Accident News
Pandharpur Accident NewsSaam tv

Pandharpur News: पतीसोबत दुचाकीवरून घराकडे जात असताना ट्रकचा धक्का लागून खाली पडलेल्या २६ वर्षीय राष्ट्रवादीच्या कार्यकर्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघाताची ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पंढरपूर-पुणे महामार्गावर भंडीशेगांव जवळ कोळ्याचा मळ येथे हा अपघात झाला. (Latest Marathi News)

योगीता स्वप्नील शिंदे असे मृत तरुणीचे नाव आहे. योगीता ही राष्ट्रवादी युवती पंढरपूर शहर उपाध्यक्ष होती. याचबरोबर योगीता ही कोटी येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात 'एम-टेक'चे शिक्षण घेत होती. योगीताच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Pandharpur Accident News
Pune Crime News: आता काय म्हणावं? मटणावरून वाद टोकाला; पतीने पत्नीच्या डोक्यात मारला मासे कापण्याचा कोयता

अपघात नेमका कसा झाला?

योगीताचे पती बँकेत नोकरी करतात. योगीताचे पती हे तिला आणण्यासाठी रविवारी कोर्टी येथे आले होते. तेथून दोघे पती-पत्नी दुचाकीवरून लवंगकडे निघाले. त्यावेळी ओव्हरटेक करताना योगीताला ट्रकचा धक्का बसला. त्यानंतर ती चाकाखाली पडली. यामध्ये ट्रकचे पाठीमागील चाक डोके आणि अंगावरून गेले. यात योगीताचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. योगिताला रुग्णवाहिकेत उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी योगिताचा पती स्वप्नील शिंदे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pandharpur Accident News
Nashik Accident News : नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन थेट नदीत कोसळली; लहान बाळासह 3 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

बुलढाण्यात ट्रॅक्टर व दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

बुलढाण्यातील डोणगावपासून जवळच असलेल्या जनूना गावाजवळ ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघाताची घटना घडली. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डोणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात घडला.

अपघात नेमका कसा झाला?

दुचाकीस्वार डोणगावकडून वाडगावकडे जात होते. ट्रॅक्टर विरुद्ध दिशेने येत असताना हा अपघात घडला. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. सदर घटनेतील अपघातग्रस्तांची दोन्ही वाहने डोणगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. या घटनेने दोघांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com