गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीचे 'मूक' आंदोलन

यावेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा तीव्र निषेध केला.
गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीचे 'मूक' आंदोलन
गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीचे 'मूक' आंदोलनजयेश गावंडे

अकोला - गॅस दरवाढ रोखण्यात केंद्र शासनाला पुरता अपयश आले असून दिवसेंदिवस घरगुती गॅस Gas दरांमध्ये होणाऱ्या दरवाढी विरोधात आज अकोल्यात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात मूक आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP उज्वला राऊत Ujjwala Raut यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यातील Akola टॉवर चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा तीव्र निषेध केला. 

हे दखल पहा -

एकीकडे महिलांना चुलीच्या धुराचा त्रास होतो म्हणून पंतप्रधानांनी महिलांना गॅस देण्याचा बनाव केला. घराघरात गॅस दिली मात्र आता गॅसची दरवाढ होत असल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडणारे नसल्याने पुन्हा केंद्र सरकार महिलांना चुलीवर जेवण बनविण्यास भाग पडणार असल्याने फसव्या मोदी सरकारच्या गॅस दर वाढी विरोधात आज हे तोंडयाला पट्ट्या बांधून मूक आंदोलन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला ग्रामीण अध्यक्षा उज्वला राऊत यांनी दिली आहे. त्यातच देशात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढू लागला आहे, केंद्र सरकारने यावर कोणतेच नियंत्रण नाही. सिलेंडरच्या दरात देखील वाढ होत असल्याने महिलांचं किचनमधील बजेट कोलमडलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.