वसईत वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

कोरोनावर औषध आहे पण मोदी वर औषध नाही. असा घणाघात यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
वसईत वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
वसईत वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन चेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई : वाढती महागाई, खाद्य तेलाच्या वाढलेल्या किंमती, पेट्रोल डिझेलचे सतत वाढत असणारे भाव आणि घरगुती गॅस च्या किंमतीत झालेली भाव वाढ आदी विषयांना घेऊन वसई-विरार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वसईमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. NCP agitation against rising inflation in Vasai

हे देखील पहा -

आंदोलना दरम्यान मोदी सरकारच्या शोषक धोरणांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोदी सरकार हाय हाय च्या घोषणा देत, केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वसई पश्चिमच्या नवघर बस स्थानक परिसरात वसई-विरार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

वसईत वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे घुमजाव !

गॅस सिलिंडरमागे 25 रुपयांची वाढ, पेट्रोल 100 पार, यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. तरीही निष्ठुर मोदी सरकार दर वाढ कमी करत नाही. कोरोनावर औषध आहे पण मोदी वर औषध नाही. असा घणाघात यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Edited by : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com