NCP Split: राष्ट्रवादी पुन्हा फुटणार? अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार गटात फूट; काही आमदारांना सत्तेचे वेध - सूत्र

NCP Split News: अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांमध्ये 2 गट पडल्याचे वृत्त समोर आले आहे.
Sharad Pawar NCP splits
Sharad Pawar NCP splitsSAAM TV

Sharad Pawar NCP Split: शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांसोबत असलेल्या आमदारांमध्ये 2 गट पडल्याचे वृत्त समोर आले आहे. यातील काही आमदारांना आता सत्तेत जाण्याचे वेध लागले आहेत.

मतदारसंघ वाचवायचे असतील आणि पुन्हा निवडून यायचं असेल तर निधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं आहे असं मत या आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar NCP splits
Maharashtra Politics: शिंदे गटाचं लवकरच विसर्जन होणार; भाजपकडून तयारी पूर्ण, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचं विधान

राष्ट्रवादीमध्येबंडखोरी करून युती सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. अर्थखात्याची सूत्रे हाती येताच अजित पवार यांनी आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या सत्तेतील सर्व आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. (Tajya Marathi Batmya)

अजित पवारांनी त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी प्रत्येकी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला आहे. या निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये खास तरतूद करण्यात आली आहे. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

Sharad Pawar NCP splits
Nashik Breaking News: अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने टोलनाक्याची तोडफोड; पोलिसांकडून मनसैनिकांवर मोठी कारवाई

अजितदादांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकास कामांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांनाही सत्तेचे वेध लागले आहेत. आपणही अजित पवारांसोबत सत्तेत जायला हवं असा सूर या आमदारांनी लावल्याची माहिती सूत्रांवी दिली आहे, तर काही आमदारांनी आपण शरद पवारांसोबत राहायला हवं असं मत व्यक्त केलं आहे. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com