जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र या - शरद पवार

खासदार शरद पवार यांनी 'ईद मिलन' कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना संबोधीत केलं.
जातीय द्वेष निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी एकत्र या - शरद पवार
Sharad PawarSaam TV

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'ईद मिलन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेकडो नागरिकांना संबोधीत केलं. जातीपातीच्या राजकारणापलीकडे जावून पवार यांनी सर्व धर्मगुरुंना एकाच व्यासपीठावर आणून एकतेचा संदेश दिला. पुण्यात 'ईद मिलन' (Eid Milan) कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधताना पवार म्हणाले, मुस्लिम, हिंदू, पारसी, शीख, बौद्ध अशा सर्व धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणून आपण एकतेचा संदेश देतोय. आपला देश अनेक जाती आणि धर्मांचा देश आहे. हे सर्व आपलं सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून ठेवण्यासाठी याला लागलेल्या विविध फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण आपल्यामध्ये कुणी जातीय द्वेष (Religion issue) निर्माण करत असेल,तर त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.असं आवाहन शरद पवार यांनी उपस्थित शेकडो नागरिकांना केलं आहे. ते पुण्यात आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.

Sharad Pawar
राज ठाकरेंना मुंबईच्या नेत्याचा इशारा, भाजपनं दिलं स्पष्टीकरण

ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. रशिया-युक्रेन युद्धासह इतर आंतराष्ट्रीय घडामोडींचाही त्यांनी उल्लेख केला. रशियासारखा ताकदवर देश एका लहान देशावर (युक्रेन) हल्ला करतोय, त्या मोठ्या देशाला मनावतेच स्मरण नाहीये. श्रीलंका या देशात बुद्धाचं तत्वज्ञान आहे. त्या देशात नागरिक रस्त्यावर उतरालाय आणि राज्याकर्त्यांना अंडरग्राउंड व्हावं लागतंय.असंही पवार म्हणाले. पाकिस्तानबाबत बोलताना पवार पुढे म्हणाले, पाकिस्तानमध्ये तुमचे माझे भाऊबंद सुद्धा राहतात. पाकिस्तानमध्ये प्रधानमंत्र्यांना पदावरून बाजूला केलं जातंय. त्या देशातील राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे हे पहायला मिळतंय. मी पाकिस्तानला अनेकवेळा गेलोय.

ज्या ठिकाणी जाईल तिथं पाकिस्तानमध्ये स्वागत केलं जायचं. देशाचा मंत्री आणि क्रिकेटच्या माध्यमातून अनेकवेळा पाकिस्तानला गेलो. पाकिस्तानात एकवेळा जेवण करायला गेल्यानंतर आमच्या जेवणाचे त्यांनी पैसे घेतले नाहीत. आम्ही त्यांचे पाहुणे आहोत म्हणून आमचा आदर केला गेला.पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाहीये.फक्त राजकीय लोक तशी परिस्थिती निर्माण करतात. तेथील लोकांचे नातेवाईक भारतात आहेत, तर भारतातील नागरिकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत.

Sharad Pawar
पत्नीच्या नोकरी करण्याच्या अधिकारावर गदा आणल्यास...; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तसंच शरद पवारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबाबती वक्तव्य केलं. यावर बोलताना पवार म्हणाले, तंत्र्याच्या आंदोलनामध्य जसे नेहरू,बोस होते तसें मौलाना अब्दुल कलामही होते.त्यामुळे आपल्या एकोप्यामुळं इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. पल्यामध्ये कुणी द्वेष निर्माण करत असेल तर अशांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल.मूलनिवासी मंचच्या काही कार्यकर्त्यांनी कोविड काळात डेड बॉडी उचलण्याचं काम केलं. कोविड काळात या संघटनांनी सर्व जातीधर्माच्या लोकांचा अंत्यविधी स्वखर्चात केला.अशा लोकांची समाजाला गरज आहे.

आज जगामध्ये जे चित्र आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ द्यायची नसेल तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. या कार्यक्रमामध्ये आलेले सर्वजण सर्वाधर्मीय, सर्वपक्षीय आहेत. पुणे शहरातून शांततेचा आणि भाईचारेचा संदेश आपण देऊयात.सर्वजण प्रत्येक धर्माच्या मनावतेच्या विचाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुयात. अशा शब्दांत शरद पवारांनी नागरिकांना संबोधीत केलं.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.