Sharad Pawar
Sharad Pawar Saam TV

Sharad Pawar News : 'कर्तृत्व फक्त पुरुषात असते, यावर...'; शरद पवार यांनी महिला दिनानिमित्त केलेलं विधान चर्चेत

'कर्तृत्व फक्त पुरुषात असते, यावर माझा विश्वास नाही, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

मुंबई : जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. राज्यभरातही महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. अशाच मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. 'कर्तृत्व फक्त पुरुषात असते, यावर माझा विश्वास नाही, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. (Latest Marathi New s)

मुंबईत (Mumbai) महिला दिनानिमित्त राज्य महिला आयोगाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शरद पवार या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना महणाले, 'आज सगळ्या जगात महिला दिन साजरा केला जातोय. राज्य सरकारने सुद्धा या निमित्ताने काही कार्यक्रम हाती घेतले. कर्तृत्व हे फक्त पुरुषातच नसतं. माझ्या मातोश्रीचा उल्लेख या कार्यक्रमात केला. त्या स्वातंत्र्याच्या चळवळीत होत्या. त्या समाजकारणात होत्या. लोकल बोर्डाच्या बैठकीला त्या कधीही उशिरा जात नव्हत्या. त्या कधीही सुट्टी घेत नव्हत्या'.

Sharad Pawar
Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसला उत्तर, काय म्हणाले वाचा सविस्तर

'माझ्या मातोश्रीला मुलं झालं आणि मुलं झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लोकल बोर्डाची बैठक होती. त्या तीन दिवसाच्या मुलाला घेऊन सभागृहात बैठकीला गेल्या होत्या. ते तीन दिवसाचं मुलं मी होतो. मला आईने जन्माच्या तिसऱ्या दिवशी सभागृह दाखवलं. त्यानंतर मग मी देशातले सगळे सभागृह पाहिले, असे पवार पुढे म्हणाले.

'मी संरक्षण खात्याचं काम केलं. मी वॉशिंग्टनला गेलो, तिथे कोणत्याही देशाचा संरक्षण मंत्री विमानातून उतरला की सलामी देतात. जेव्हा ही सलामी पाहिली, तेव्हा सगळ्या महिला सैनिकांनी सलामी दिली. देशात आल्यावर मी तिन्ही सैन्य दलाच्या प्रामुख्याने बैठकीला बोलावलं. त्यांना महिला सैनिकांच्या सलामीबद्दल सांगितलं. आपल्या देशात सैन्य दलात महिला का नाही? ते सैन्य दलाचे प्रमुख म्हणाले हे आपल्या देशात शक्य नाही. तेव्हा मी त्यांना कारण विचारलं, तर त्यांनी कारणे सांगितली', असे शरद पवार पुढे म्हणाले.

'मी म्हटलं मी संरक्षण मंत्री आहे. मला निर्णय घेण्याचे अधिकार आणि तुमचं काम अमलबजावणी करण्याचं आहे. त्यानंतर मी दोन महिन्यांनी बैठक घेतली. त्यानंतर तिन्ही सैन्य दलात ११ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या हातात कोणतंही काम दिलं, तर ती बारकाईने करते. यामुळे सैन्यदलात लढाऊ विमानाचे अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले, असे पवार पुढे म्हणाले.

Sharad Pawar
Bachchu Kadu News : बच्चू कडूंना मोठा दिलासा; तात्पुरता जामीन मंजूर

'मी मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला की वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा आणि मुलाचा समान अधिकार असला पाहिजे. तेव्हा हा कायदा पास झाला पाहिजे हे सांगितलं. महिलांनी आपला अधिकार मिळवला पाहिजे. अधिकार मिळत नसतील तर आम्ही जागरूक राहू, वेळ पडला तर संघर्ष करू, असेही पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com