Sharad Pawar : राज्यातील पूरपरिस्थितीवरून शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले...

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने आणि राज्यातील पूरपरिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
sharad pawar and eknath shinde
sharad pawar and eknath shinde saam tv

नाशिक : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार विराजमान झालं आहे. तर महाविकास आघाडी विरोधी बाकावर बसली आहे. मात्र, राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच चालवला जात आहे. मात्र, सरकारला एक महिन्याहून अधिक लोटला तरी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने आणि राज्यातील पूरपरिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 'स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात, अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. (Sharad Pawar News In Marathi )

sharad pawar and eknath shinde
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी लिलावती रुग्णालयात दाखल; मुख्यमंत्रीही पोहोचले भेटीला

शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या नाशिकच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, 'एक महिना झाला राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूरस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ असणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते हे ज्या भागात लोक संकटात आहे, त्या ठिकाणी भेट देत आहेत. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घ्यावा. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात'.

sharad pawar and eknath shinde
Satara : शिवेंद्रसिंहराजेंचं चॅलेंज उदयनराजे स्विकारणार ?

शिंदे सरकार पडेल का ? पत्रकाराच्या या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'सराकर पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही आम्ही तयार आहोत'. तर कोर्टाच्या ओबीसी आरक्षणावरील निर्णयावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती याने निर्माण झाली आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com