बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील, शरद पवारांचा इशारा

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन त्यांच्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीत महाराष्ट्राच्या राजकारणाची रणनीती आखली आहे.
बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील, शरद पवारांचा इशारा
Sharad PawarSaam Tv

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन त्यांच्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीत महाराष्ट्राच्या राजकारणाची रणनीती आखली आहे. अशातच शिंदे गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आणखीनच ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. अडीच वर्ष महाविकास आघाडीने मोठे निर्णय घेतले आहेत. बंड करणे हे राजकीय अज्ञान आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मविआ (mva government) बहुमत सिद्ध करेल. ज्या आमदारांनी बंड केले आहे, त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पवार यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे गटाला दिला आहे.

Sharad Pawar
आम्ही सर्व उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणार, कदापी मागे हटणार नाही - अजित पवार

माध्यमांशी बोलताना पवार पुढे म्हणाले, पॅसिद्धी माध्यमातून काही गोष्टी पुढे आल्या. जे सदस्य महाराष्ट्राबाहेर गेले, ते इथे आल्यावर लोकांना वस्तुस्थिती सांगतील आणि बहुमत सिद्ध करुन दाखवतील.याआधीही महाराष्ट्राने अशा प्रकारची परिस्थिती बघीतली आहे. मला खात्री आहे उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात मविआ बहुमत सिद्ध करेल. गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहिती आहे. कोणता राष्ट्रीय पक्ष शिंदेंसोबत आहे हे सांगण्याची गरज नाही.

Sharad Pawar
मविआ सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादी शेवटपर्यंत प्रयत्न करेल : अजित पवार

मला वाटत नाही महाराष्ट्रात भाजपचे नेते येवून त्या आमदारांना मार्गदर्शन करतील. राज्याबाहेरील परिस्थिती आम्हाला माहिती आहे. बंडखोर आमदारांना राज्यपालांकडे किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. तसंच पवार पुढे म्हणाले, सुरत आणि आसाम मध्ये जे लोक व्यवस्था केले ते अजित पवारांच्या ओळखीचे आहेत असे वाटत नाही.

आसाम मधील राज्य सरकार ऍक्टिव्ह आहे. सुरत आणि आसामची व्यवस्था करणारी लोकांना अजित पवार परिचयाचे नाहीत, माझ्या परिचयाचे आहेत. आसाम मधील व्यवस्था राज्य सरकार करत आहे. तिथे भाजपची सत्ता आहे.वस्तुस्थिती स्पष्ट होते.नाव घ्यायची गरज नाही. इथे नाही पण तिथे कोण आहे दिसत आहे, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com