राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या वाहनाचा अपघात

चांदवड टोल नाक्याच्या काही अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या भल्यामोठ्या खड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या वाहनाचा अपघात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या वाहनाचा अपघातभूषण अहिरे

भूषण अहिरे

धुळे: राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले Ranjit Raje Bhosale यांचा मुंबईहून Mumbai परततांना पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान चांदवड टोल नाक्याच्या काही अंतरावर मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या भल्यामोठ्या खड्यांचा अंदाज न आल्यामुळे अपघात Accident झाला आहे. NCP district president Ranjit Raje Bhosale's vehicle crashed

हे देखील पहा-

रस्ता पासून तब्बल पंचवीस ते तीस फुट लांब वाहन फेकले गेले. सुदैवाने या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले मुंबई येथून पक्षश्रेष्ठींशी महत्त्वाची बैठक आटोपून धुळ्याकडे येत असताना हा अपघात झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या वाहनाचा अपघात
महाराष्ट्राचे लाडके म्हणतं, lil champs ना मिळाली प्रेक्षकांची नापंसती

रंजीत राजे भोसले यांच्यासह अपघातग्रस्त वाहनात असलेले चार जण थोडक्यात बचावले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांनी तात्काळ मदतीचा हात दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाहनात असलेले पाचही जणांना किरकोळ जखमा झाल्याने त्यांना धुळ्यातील Dhule खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com