भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलली; एकनाथ खडसे म्हणाले...

पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आले आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलली; एकनाथ खडसे म्हणाले...
Ekanath khadse and Pankaja Munde Saam Tv

डोंबिवली : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारींच्या यादीत पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आले आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून डावलण्यात आलं याचं मला दु:ख आहे', अशा शब्दात एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे हे डोंबिवली येथे नातेवाईकांच्या घरी भेटण्यासाठी आले होते. (Maharashtra Politics News In Marathi )

Ekanath khadse and Pankaja Munde
राज ठाकरेंनी मनसैनिकांना ॲाडियो क्लिपद्वारे केलं 'हे' आवाहन

एकनाथ खडसे म्हणाले, 'पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलले याचं मला दुःख आहे. मुंडे-महाजन-खडसे या नावाने काही कालखंड भाजपाची ओळख होती. वर्षानुवर्ष अनेकांनी त्यात योगदान दिलं. अनेकाच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला. मुंडे साहेब आमचे नेते होते. त्यांनी यासाठी उभे आयुष्य खर्ची घातलं, त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला प्रामुख्याने पंकजाताई सारख्या ओबीसी नेतृत्वाचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे. तिला मानणारा वर्ग मोठा आहे. अशा स्थितीत तिला डावलण्याचं काय कारण आहे हे मी समजू शकलेलं नाही, अशी खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

Ekanath khadse and Pankaja Munde
'राज्यसभा निवडणुकीत गाफील राहून पराभव झाला, मात्र...'; एकनाथ खडसेंचे सूचक वक्तव्य

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता अपक्ष आमदारांवर विविध आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, 'मतदारावर विश्वास दाखवावा लागतो. मत दिलं की नाही दिलं हा अंदाज असू शकतो, मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य होत नाही, आमदारांवर जी जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी निश्चितपणे पार पाडलेली दिसत आहे. मी प्रतोद अनिल पाटील त्यांच्याशी चर्चा केली, ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. यांनी मला सांगितलं तिघांनी मतदान केलय याची मला खात्री आहे'. एकनाथ खडसेंनी अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com