उजनीच्या पाण्यावरून पालकमंत्र्यांच्या विरोधात पंढरपुरात राष्ट्रवादीचा एल्गार

तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांचा आंदोलनाचा इशारा
Pandharpur News
Pandharpur NewsSaam Tv

पांढरपूर - उजनी पाणी प्रश्नावरून सोलापूर (Solapur) जिल्ह्यात विरोधकांनी रान उठवले असतानाच, आता पंढरपूर (Pandharpur) तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी ही या योजनेला विरोध करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. राष्ट्रवादीच्या विरोधामुळे उजनी‌ पाणी प्रश्न अधिक पेटण्याची शक्यता आहे.

हे देखील पाहा -

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे. या विरोधात भाजपसह विविध शेतकरी संघटनांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही पालकमंत्री भरणे यांच्या या योजनेला विरोध केला आहे.

Pandharpur News
Cyber Crime: बोनी कपूर यांना पावणे चार लाखांचा गंडा; क्रेडीट कार्डद्वारे फसवणूक

या संदर्भात आज पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसे अध्यक्ष विजयसिंह देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली. उजनीच्या पाण्यावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यां प्रथम हक्क आहे. आमच्या हक्काचे पाणी जर कोणी पळवून नेण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापी सहन करणार नाही. प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ही श्री. देशमुख यांनी दिला आहे. देशमुख यांच्या या इशार्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत असलेला वाद उफाळून आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com