जळगाव जिल्हा बँक - गुलाबराव देवकरांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्याम सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे
गुलाबराव देवकर - श्याम सोनवणे
गुलाबराव देवकर - श्याम सोनवणे- Saam TV

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या (Jalgaon District Bank) अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) गुलाबराव देवकर तर शिवसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी श्याम सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. NCP Gulabrao Deokar to Head Jalgaon District Bank

तब्बल एक ते दीड महिन्यांपासून जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज जिल्हा बँकेत पहिल्या तीन वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) नावावर तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून (Shivsena) श्याम सोनवणे शिक्कामोर्तब झाले आहे.

गुलाबराव देवकर - श्याम सोनवणे
ओमिक्रॉनचा पहिल्या रुग्णाने दुबईला काढला पळ ! नेमकं काय झालं ?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी २० जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली होती. यानंतर काल शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. यात राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचा अधिकार वरिष्ठ पातळीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते.

तब्बल तासभर खडसे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बंदद्वार बैठकीत पहिल्या तीन वर्षांसाठी अध्यक्षपदाची माळ गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात पडली आहे. तर सेनेकडून पुढील तीन वर्षांसाठी उपाध्यक्षपदी श्याम सोनवणे राहणार आहेत.

Edited By - Amit Golwalkar

हे देखिल पहा -

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com