Ajit Pawar News: राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती; अजित पवारांची विरोधकांवर कडाडले

"पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली असून लोकशाही अडचणीत आली आहे"
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV

Sangli News : महापुरुषांना काही बोलणाऱ्या नेते आणि मंत्र्यांना लाल लज्जा शरम नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली आहे. लोकशाही अडचणीत आली आहे असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Kerala Accident News : मुंबईच्या पर्यटकांना घेऊन जाणारी मिनीबस दरीत कोसळली; २२ जण जखमी

सत्ता येत असते आणि जात असते, पण कोणीच ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही, मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती आली आहे. पक्षांतर बंदी कायद्याला तिलांजली दिली असून लोकशाही अडचणीत आली आहे. महापुरुषांना काही बोलणाऱ्या नेते आणि मंत्र्यांना लाल लज्जा शरम आहे की नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

सांगली (Sangli) जिल्ह्यातील आरेवाडी ग्रामपंचायतीच्या नूतन ग्राम सचिवालय इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि विविध विकास कामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर ते बोलत होते.

Ajit Pawar
Crime News: बीड पुन्हा हादरले! सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना, भररस्त्यात 40 वर्षीय हॉटेल कामगाराची हत्या

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल स्वराज रक्षक वक्तव्याचा पुन्हा उच्चार करत, अजित पवार पुढे म्हणाले, मी काही चुकीचं बोललो नाही, पण ज्यांनी महापुरुषांच्या अवमान केला त्या पासून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधाकांकडून टुकारपणा चालू आहे.

आताच्या सत्ताधाऱ्यांना महिलांची मत पाहिजे असतात, मात्र ते मंत्रिमंडळात एका ही महिलेला मंत्री केले नाही. मंत्रिमडळ विस्तार करत नाहीत. अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे, आम्ही सुरू केलेल्या कामाना स्थगिती दिली जात आहे, अशी टीका ही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com