Ajit Pawar : एखाद्या माणसानं इतकंही दुटप्पी.., राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा अजित पवारांकडून समाचार

राज ठाकरे यांचा आरोप धांदात खोटा, बिनबुडाचा आणि हास्यास्पद आहे. एखाद्या माणसानं इतकंही दुटप्पी वागू नये, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
Ajit Pawar vs Raj Thackeray
Ajit Pawar vs Raj Thackeray Saam Tv

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरूवातीपासून जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचा आरोप धांदात खोटा, बिनबुडाचा आणि हास्यास्पद आहे. एखाद्या माणसानं इतकंही दुटप्पी वागू नये, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. (Maharashtra Politics News)

Ajit Pawar vs Raj Thackeray
Breaking News : महाराष्ट्रातील 'या' दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी; CM शिंदेंनी दिली माहिती

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या आरोपांचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. शरद पवार यांचं नाव घेतलं तर ती बातमी होते. त्यामुळे अशा पद्धतीने राज ठाकरेंसारख्या व्यक्तीने असं विधान करणं योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले?

"राज ठाकरे यांनी ज्यावेळेस पवार साहेबांची मुलाखत घेतली, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते आणि आता काय बोलत आहे. माणसाने इतकं दुटप्पी वागू नये. पवारसाहेबांना ५५ वर्षापासून उभा महाराष्ट्र ओळखत आहे. ५५ वर्षात साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला. तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. राज ठाकरे यांनी केलेले आरोप हे हास्यास्पद आहे", असं अजित पवारांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar vs Raj Thackeray
Eknath Shinde : PM मोदींच्या 'त्या' निर्णयामुळे शिंदे सरकारच्या अडचणी वाढणार? विरोधक घेरण्याच्या तयारीत!

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावर असताना, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केला होता. जातीच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या काही गोष्टी समोर आणल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.

इतकंच नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले होते. शरद पवार हे नेहमी शाहू फुले आंबेडकर हीच नावे घेतात. शिवाजी महाराजांचे यामध्ये नाव घेत नाहीत. इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असून १९९९ पासून राज्यात विष कालवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com