Maharashtra Politics: अजितदादा मुख्यमंत्री होणारच... वेट अँड वॉच..; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

अजितदादा मुख्यमंत्री होणारचं. हे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी देखील मान्य केलंय. वेट अँड वॉच, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
Ajit Pawar
Ajit Pawarsaam tv

Amol mitkari News: 'महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादा सारखा अभ्यासू माणूस नाही.त्यामुळं अजितदादा मुख्यमंत्री होणारचं. हे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी देखील मान्य केलंय. वेट अँड वॉच, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. ते बीडमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Latest Marathi News)

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, कार्यकर्ते म्हणून सर्वांची ही भावना आहे. जसं हे राज्य व्हाव, ही तो श्रींची इच्छा, असे इतिहासामध्ये आम्ही वाक्य ऐकले, बखरीमध्ये वाचले. तत्कालीन रयतेला तसं वाटलं होतं.आता तो काळ नाही राहिला, पण आता लोकशाहीमध्ये प्रशासनावर पकड असणारा अभ्यासू व्यक्तीमत्व असणारा एखादा व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असावा. ही भूमिका अन् भावना प्रत्येकाची आहे, माझी सुद्धा भावना कार्यकर्ता म्हणून आहे, असंही यावेळी मिटकरी म्हणाले.

Ajit Pawar
Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्राचा पहिला नंबर; फडणवीसांकडून जनतेचे अभिनंदन

ते पुढे म्हणाले, की त्यामुळे धाराशिवमध्ये लागलेले बॅनर, नागपूर मध्ये लागलेले बॅनरवरून स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी देखील ते मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेतृत्व अजितदादा आहेत. भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व अजितदादा करतील याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही आणि ते करावं'.

कारण अजितदादा सारखा दुसरा तोला मोलाचा नेता महाराष्ट्राचा राजकारण सापडेल, असं सध्या तरी महाराष्ट्रात नाही. हे दस्तूरखुद्द अमित शहा यांनी मान्य केलेलं आहे, असा गौफ्यस्फोट देखील यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Ajit Pawar
Rahul Gandhi News: राहुल गांधींना मोठा धक्का; गुजरातच्या हायकोर्टाच्या न्यायधीशांकडून बाजू ऐकून घेण्यास नकार

दरम्यान, 'अजितदादा मुख्यमंत्री होणारचं आहेत. "वेट अँड वॉच", दिल्लीतून सुत्र जवळपास.. एकनाथ शिंदे साहेब सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत. त्याचा आणि याच्याशी संबंध लावण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आणि मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com