'भाजपचे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होणार नाही'

सर्व राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होणार नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे.
 'भाजपचे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होणार नाही'
BJP flag Saam Tv

औरंगाबाद : विधान परिषद निवडणुकीच्या (Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्याचे दिसत आहे. काल (मंगळवार) शिवसेनेचे नाराज नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सुरत गाठले होते. या बंडखोर आमदारांचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. मात्र, या सर्व राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होणार नाही, अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली आहे. ( Maharashtra Political Crisis News In Marathi )

BJP flag
एकनाथ शिंदे यांचे बंडखोरीनंतर दुसरे ट्विट; उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारसोबत असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे यांच्या बंडाळीने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या राजकीय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मिटकरी म्हणाले, 'राज्याच्या घडामोडीवर उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि नेत्यांची बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत आहे. महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही. आता दोन आमदार माघारी आलेले आहेत. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होणार नाही'.

BJP flag
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर प्रताप सरनाईक यांचे 'ते' पत्र व्हायरल

शिवसैनिकांचे एकनाथ शिंदेंविरोधातील मूक आंदोलन अचानक स्थगित

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नाराज आमदारांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने पक्ष अडचणीत आला आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांमुळे राज्यात सत्तापालट होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या सर्व राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे नवी मुंबईच्या शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गणेश नाईकांची (Ganesh Naik) साथ सोडून शिवसेनेत (Shivsena) आलेल्या नगरसेवकांची देखील गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com