Chhagan Bhujbal On Saptashrungi Temple Dress Code:...तर मंदिरात उघडे बसणाऱ्या पुजाऱ्यानींही सदरा घातला पाहिजे; भुजबळांचं ड्रेसकोडवर वक्तव्य

'आता मंदिरात उघडे बसणाऱ्या पुजाऱ्यानींही सदरा घातला पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal On Saptashrungi Temple Dress Code
Chhagan Bhujbal On Saptashrungi Temple Dress CodeSaam tv

Chhagan Bhujbal News: नाशिकच्या सप्तश्रृंगी मंदिरात प्रवेश करताना ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सप्तश्रृंगी मंदिराच्या ड्रेसकोड लागू करण्याच्या शक्यतेवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाष्य करत सवाल उपस्थित केले आहेत. 'आता मंदिरात उघडे बसणाऱ्या पुजाऱ्यानींही सदरा घातला पाहिजे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

नागपूर शहरात मंदिरांमध्ये ड्रेस कोड करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता नाशिकमध्येही ड्रेसकोड सक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या ड्रेसकोड सक्तीला छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. सप्तश्रृंगी ड्रेसकोडवर भाष्य करताना म्हटले की, 'मंदिरात ड्रेसकोड लागू करणं हा मूर्खपणा आहे. मंदिरात बसलेले पुजारी उघडेच बसतात. त्यांनी पण अंगात सदरा घातला पाहिजे'.

Chhagan Bhujbal On Saptashrungi Temple Dress Code
Sanjay Rathod News: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार? मंत्री संजय राठोड यांनी दिली महत्वाची माहिती

नवीन संसद भवन उद्घाटनावर भाष्य करताना छगन भुजबळावर भाष्य केलं आहे. 'काय चाललंय. ते सगळे उघडे उघडेबंब होते. यावर शरद पवार साहेबांनी दोन वाक्यात सांगितलं. 'मी या सर्वधर्म कांडात सहभागी झालो नाही, याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले.

'जे काही झालं ते मनाला वेदना देणारं आहे. लोकतंत्र चालू होत की मनूतंत्र काही कळत नव्हतं. नवीन संसद झाली पाहिजे यात काही दुमत नाही. मात्र देशात लोकशाही असून सर्वांना सोबत घेऊन उद्घाटन झालं पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal On Saptashrungi Temple Dress Code
Bandra Versova Sea Link : वांद्रे-वर्सोवा सी लिंक 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' म्हणून ओळखला जाणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

एकत्रित निवडणुकांवर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, 'उद्या निवडणुका घेतल्या तरी आम्ही तयार आहे. कर्नाटकमध्ये जे पानिपत झालं, त्यावरून असा निर्णय घेतील असं वाटत नाही'.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या बूथरचनेची जबाबदारी धनंजय मुंडे यांना देण्यात आली आहे. यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, ' यावरून गैरसमज पसरवले जात आहेत. पुण्यात देखील शेळके यांची नियुक्ती झाली आहे. याचा अर्थ अजित पवार आऊट झालेत का? काही नेत्यांवर बूथ कमिट्या झाल्यात का हे पाहण्याची जबाबदारी दिली आहे. एका नेत्यावर ४-५ जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com