मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या नेत्यांनी संजय राऊतांविरोधात शरद पवारांकडे तक्रार

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी संजय राऊत यांची पवारांकडे तक्रार केल्याची माहिती आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या नेत्यांनी संजय राऊतांविरोधात शरद पवारांकडे तक्रार
Sharad Pawar News, Sanjay Raut News, NCP NewsSaam TV

मुंबई : मुंबई : आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या आरोपामुळे ही तक्रार केली असल्याची माहिती आहे. (Sanjay Raut Latest News)

 Sharad Pawar News, Sanjay Raut News, NCP News
अजित पवारांनी आमच्यासोबत यावं; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान

शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवास्थानी सकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत ही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आहे. संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण होत असल्याची तक्रार राष्ट्रवादींच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील भाजप विरुद्ध शिवसेनेच्या महायुद्धात शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. यात महाराष्ट्रातील सहापैकी तीन जागांवर भाजपचा विजय झाला, तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली.

 Sharad Pawar News, Sanjay Raut News, NCP News
राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्यानं शरद पवारांची नाराजी; प्रमुख नेत्यांना म्हणाले...

शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात झालेल्या थेट सामन्यात भाजपचा विजय झाला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विजयाचं खाप अपक्ष आमदारांवर फोडलं होतं. इतकंच नाही तर, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे यांनी शब्द देऊनही मतदान केले नसल्याचा आरोप संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला होता.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर अपक्ष आमदार नाराज झाले. त्यानंतर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी देखील रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी कुणाला मतदान केलं हे देखील शरद पवार यांना सांगितलं होतं. त्यातच संजय राऊत यांनी आरोप केलेले तिनही अपक्ष आमदार हे राष्ट्रवादीचे निकवर्तीय असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संजय राऊतांविषयी शरद पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com