Dhananjay Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या दाव्यानंतर भाऊ धनंजय मुंडे यांनी देखील मोठा दावा केला आहे. जिल्ह्यातील ३४५ ग्रामपंचायत या राष्ट्रवादी प्रणित पॅनलच्या ताब्यात आल्या आहेत. माझ्या कार्यकाळात ग्रामपंचायतीचा एकतर्फी निकाल मी पहिल्यांदाच पाहिला, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मोठा दावा केला आहे. (Latest Marathi News)
धनंजय मुंडे (Dhanjay Munde) म्हणाले, ज्या ग्रामपंचायतीमध्ये इतर नेत्यांचे फोटो लावल्या जात नव्हते, त्या ग्रामपंचायती आमच्या ताब्यात आल्या आहेत. हे खूप अभूतपूर्व आहे. बदल हा मुळापासून झाला आहे म्हणून याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीवर निश्चित दिसून येतील'.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा ३४५ चा टप्पा राष्ट्रवादीने गाठला आहे. परळी तालुक्यात ५० आल्या असून अंबाजोगाई तालुक्यातील परळी मतदार संघात येणाऱ्या ३५ अशा एकूण ८५ ग्रामपंचायतीवर घवघवीत यश राष्ट्रवादी पक्षाला आले आहे.
परळी मतदार संघातील एकूण ग्रामपंचायतीमध्ये अभूतपूर्व निकाल हा राष्ट्रवादीच्या बाजूने लागला आहे. अद्याप काही तालुक्यातील निकाल हाती येण्याचे बाकी आहे म्हणून अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र, जिल्ह्यात ३५० चा आकडा राष्ट्रवादी पार करेल,असा विश्वास देखील धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
या सरकारवर मतदाराची नाराजी आहे, त्यामुळं मोठा कौल म्हणून त्याचा परिणाम हा ग्रामपंचायतीचा निकाल आहे, असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.