...तर भाजपला ते सहन होत नाही : जयंत पाटील

jayant patil
jayant patil

सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर आयकर विभागाचे धाडसुत्र सुरु हाेते. हे सर्व अजित दादा बदनाम करण्यासाठी केले जात आहे. भाजपचे नेते ज्याचे नाव घेतात त्याच्यांवर सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग धडाधड कारवाईचा बडगा उगारत आहे. या सर्व संस्था अधिकारी चालवत नाहीत तर भाजपचे नेते चालवतात अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली. ते सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे एका कार्यक्रमात बोलत होते. ncp-leader-jayant-patil-on-cbi-ed-income-tax-department-bjp-political-news-sml80

सांगली येथील पलूस तालुक्यातील कुंडल येथे आमदार अरुण अण्णा लाड यांचा भव्य नागरी सत्कार समारंभात मंत्री जयंत पाटील बाेलत हाेते. त्यावेळी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

jayant patil
चर्चाच चर्चा उदयनराजे-रामराजेंच्या भेटीची चर्चा

सध्या दाेन माणसं बहुतांश गाेष्टी खासगीकरण करण्यात मग्न आहेत. याचा फरक तुम्हा-आम्हांला पडत आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढत चालली आहे. तरीही खासगीकरणाचा फंडा थांबत नाहीये. सोयाबीनला ११ हजार रुपये जास्त मिळाले तर भाजपवाल्याने सहन झाले नाही. मुद्दामहून साेयाबीनचा दर पाडला गेला असे मंत्री जयंत पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले देशात शेतकऱ्यांच्या हातात काही जाऊ लागले तर भाजपला सहन होत नाही. हे वारंवार दिसून येत आहे. या देशात शेतकऱ्याला चिरडून मारले तर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्याचा गळा कापण्यासाठी बघत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही अशा इशारा त्यांनी दिली.

शेतकऱ्यासाठी जाचक कायदा येत आहेत. येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपण आवाज उठवला तर सीबीआय, आयकर विभाग छापे टाकतात. या राज्यात छगन भुजबळ यांना अटक केली. न्यायालयात छगन भुजबळ यांनी काहीच घोटाळा केला नाही हे निष्पन्न झाले. अनिल देशमुख यांचे ही असेच झाले आहे. हे सगळे काेणाच्या सांगण्यावरुन काेणत्या यंत्रणा करताहेत हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com