शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, ४० आमदारांवर टांगती तलवार, जयंत पाटील कडाडले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.
Jayant Patil
Jayant Patil SAAM TV

बीड : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार नव्याने स्थापन झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडाकावून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कोंडी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यातील राजकीय घमासान सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे. शिंदे गटाच्या ४०आमदारांवर टांगती तलवार आहे, अशी घणाघाती टीका करत पाटील (jayant patil) यांनी सरकारवर निशाणा साधला. बीडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.

Jayant Patil
बाप पळवणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार हे जास्त काळ टीकणारे सरकार नाही. हे सरकार लवकरच कोसळेल. शिंदे गटाच्या ४० आमदारांवर सध्या टांगती तलवार असून ते कोर्टाच्या वाऱ्या करत आहेत. या चाळीस आमदारांना मंत्रिपद पाहिजे, म्हणून हे सरकार अस्थिर सरकार आहे.

राज्यात अनेक प्रश्न सध्या डोकं वर करून आहेत.शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि या सरकारच्या मंत्र्यांना आपली सत्ता टीकवण्याचे पडले आहे. राज्यातून मोठे उद्योग परराज्यात गेले आणि मुख्यमंत्री मात्र दिल्ली दौऱ्यावर आहेत.त्यांना राज्यातील निर्माण झालेल्या संकटाचे गांभीर्य नाही, अस म्हणत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

Jayant Patil
Shivsena Melava: शिवसेनेच्या मेळाव्यात भास्कर जाधवांची तोफ धडाडली, भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल

दिल्लीवारीत गुंतलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांबाबत देणंघेणं नाही. राज्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यास हे सरकार सपशेल अपयशी ठरलंय. असं म्हणत जयंत पाटील यांनी सरकारचा चांगला समाचार घेतलाय. ते बीडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

चाळीस आमदार जे फुटून गेलेले आहेत, त्यांच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे १०६ आमदार वेठीस धरले जात आहेत . ज्यांनी सगळा अट्टाहास केला होता, त्यांना मुख्यमंत्री पदाऐवजी उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. जे ४० आमदार फुटून गेलेले आहेत त्यांच्या मागण्या अवास्तव आहेत. त्यांच्या मागण्याला भारतीय जनता पार्टीच्या नेते देखील त्याला कंटाळलेले आहेत. आज महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. गोगलगायचा प्रादुर्भाव झाला, मात्र याकडे लक्ष देण्यासाठी, शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे.,असं म्हणत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com