'राष्ट्रवादीचे निर्णय मुंबईत अन् काँग्रेसचे...' जयंत पाटील यांचा काँग्रेस पक्षाला चिमटा

काँग्रेसने माजी आमदार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना जाहीर केली आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसला चिमटा काढला आहे.
'राष्ट्रवादीचे निर्णय मुंबईत अन् काँग्रेसचे...' जयंत पाटील यांचा काँग्रेस पक्षाला चिमटा
Jayant patilSaam Tv

विजय पाटील

सांगली : राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी आमदार चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काँग्रेसला (Congress) चिमटा काढला आहे. ( Maharashtra Political News In Marathi )

Jayant patil
राष्ट्रपतिपदासाठी शरद पवारांचे नाव निश्चित झालं तर..., काँग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं

सांगली जिल्ह्यातील खानापूर नगरपंचायतीच्या काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यासाठी राष्ट्रवादीने पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय मुंबईत होतात आणि काँग्रेस पक्षाचे निर्णय दिल्लीत होतात. हा दोन्ही पक्षांमधला एवढाच फरक आहे', असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेस पक्षाला चिमटा काढला.

Jayant patil
आषाढीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंदिर समितीकडून निमंत्रण

पुढे जयंत पाटील म्हणाले, 'काँग्रेस पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्याच कोणत्या पक्षात आलाय असे मानू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्या विचार आणि तत्वावर चालतो'. असा सल्ला देखील पाटील यांनी पक्ष प्रवेश केलेल्यांना जयंत पाटील यांनी दिला. ' राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसच्याच विचाराने चालतो. काँग्रेसची तत्व हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तत्व आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं उभं आयुष्य देखील काँग्रेस पक्षामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या धोरण आणि विचारांमध्ये पक्ष बदल करत नाही', असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com