Jitendra Awhad Tweet On Rs 2000 note : नोटबंदीवरून जितेंद्र आव्हाड भडकले; इतिहासाची आठवण करुन देत केंद्र सरकारवर टीकास्त्र

३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांना आपल्या जवळील नोटा बदलून घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
jitendra Awhad News
jitendra Awhad NewsSaam TV

Jitendra Awhad: आरबीआयने २००० रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांना आपल्या जवळील नोटा बदलून घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

राज्यात विरोधकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेते मंडळींनी या विषयावरून केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडलं आहे. अशात आता जितेंद्र आव्हाडांनी देखील केंद्र सरकारवर इतिहासाची आठवण करुन देत खरमरीत टीका केली आहे.

jitendra Awhad News
Bank Of Maharashtra च्या बँकेचा व्यवहार 21 टक्क्यांनी वाढला! तर 840 कोटी रुपयांचा नफा!

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक ट्वीट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, "टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत. साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होऊन जाईल …", असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

आरबीआयने असा निर्णय का घेतला? बँकिंग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

२००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या निर्णयाने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरबीआयने या २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्यास सांगितल्या आहेत. याच २००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या प्रक्रियेवर बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी भाष्य केलं आहे.

jitendra Awhad News
Rs 2000 Note Withdrawn: दोन हजाराची नोट चलनातून बाद, आरबीआयने असा निर्णय का घेतला? बँकिंग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

२००० रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याच्या प्रक्रियेवर विद्याधर अनास्कर म्हणाले, 'आरबीआयने घेतलेला निर्णय हा नोटबंदीचा निर्णय नाही. २००० रुपयांच्या कायदेशीर निविदा (legal Tender) म्हणून चालणार आहे. सप्टेंबर महिन्यानंतर जर नोटा असतील तर फक्त एक प्रक्रिया केली जाणार आहे'.

'जेव्हा नोटा छापल्या, तेव्हाच कागदाची गुणवत्ता वापरली, त्यानुसार ५ वर्षांनी या नोटा परत घेणार असल्याचे ठरले होते. त्यानुसार २०१८ मध्ये नोटा चालणे बंद झाले झाले होते. बनावट नोटा मोठ्या प्रमाणात चलनात वाढतात. त्यामुळे नोटा परत घेतल्या जातात, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com