Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी पैशांचा वापर सुरू; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे.
JItendra Awhad
JItendra Awhadsaam tv

Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील खोके संस्कृती ही आता स्थानिक पातळीवर ठाण्यातही रुजवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून पैशांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. (Latest Marathi news)

JItendra Awhad
Dhananjay Munde : मराठवाड्यातील सर्व निवडणुका 'मविआ'च जिंकणार; दळभद्री भाजपच्या हाती.., धनंजय मुंडेंची जहरी टीका

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, 'राज्यातील खोके संस्कृती ही स्थानिक पातळीवर ठाण्यातही रुजवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे .राष्ट्रवादी फोडण्यासाठी आता कार्यकर्त्यांना एक कोटी, प्रभागातील कामांसाठी १० ते २० कोटीची आमिषे दाखवली जात आहे'.

'नगरसेवकांच्या घरी जाऊन तासंतास बसायचं त्यांच्यावर दबाव टाकायचा जुने गुन्हे उकरून काढायची धमकी द्यायची हे असे प्रकार यापूर्वी ठाण्यात कधीही झाले नाहीत. ही ठाण्याची (Thane) संस्कृती नाही. मात्र, सध्या राज्यातील खोके संस्कृती ठाण्यातही सुरू झाली आहे, असा आरोप जितेंद्र आरोप यांनी केला आहे. या खोके संस्कृतीला अजिबात थारा देणार नसल्याचा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

JItendra Awhad
Narayan Rane News : नारायण राणे फक्त कुंकवाला धनी, बाकी त्यांचा काही उपयोग नाही : विनायक राऊत

कळव्यातील 29 बेकायदेशीर बांधकाम सुरू : जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादीचे नेते माजी गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यासोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. त्यात कळव्यात 29 बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

बांधकामे उभी करण्यासाठी तुम्ही पैस घेता आणि पाडताना माझे नाव लोकांना सांगता. एका बांधकामांसाठी तुम्ही पैसे घेतले आहेत, असा आरोप करत कोणाकडून पैसे घेतले, ते उघडकीस करणार असल्याचे आव्हाड यांनी संभाषण क्लिप मध्ये बोलताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com