काँग्रेसच्या 'एकला चलो' भूमीकेवर शरद पवारांनी लगावला टोला; म्हणाले, स्वबळावर लढण्यास...

एकीकडे भाजपने शिंदे गटाच्या साह्याने शिवसेनेला सुरुंग लावत, मुंबई महापालिकेस राज्यभरातील सर्वच आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे.
Sharad Pawar Vs Nana Patole
Sharad Pawar Vs Nana PatoleSaam TV

पंढरपूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा उपरोधिक टोला शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे. शरद पवार पंढरपूरमधील कुर्डुवाडी येथे आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी पटोलेंना टोला लगावला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसंच निवडणुका लढवताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्यावा लागतात असं देखील त्यांनी काल सांगितलं होतं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याचे संकेत पटोले यांनी दिले आहेत.

पाहा व्हिडीओ -

एकीकडे भाजपने शिंदे गटाच्या साह्याने शिवसेनेला सुरुंग लावत, मुंबई महापालिकेस (BMC) राज्यभरातील सर्वच आगामी निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करायतं असेल तर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र येत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणूका लढवल्या तर भाजप पराभूत होऊ शकतं असं ठाकरे गटासह राष्ट्रवादीमधील नेत्यांचं मतं आहे.

Sharad Pawar Vs Nana Patole
मृतदेह शोधण्यासाठी NDRF चा जवान धरणात उतरला अन् नशिबाने केला घात; केवळ ऑक्सिजन सिलिंडरच आला वर

मात्र, पहिल्यापासून आघाडी धर्मात आमच्यावर अन्याय झाल्याची भावना असणाऱ्या काँग्रेसने आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पटोलेंच्या याच भूमीकेबाबात राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता, 'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत' असं म्हणत नाना पटोले यांचे नाव न घेता पवारांनी उपरोधिक टोला लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com