Sharad Pawar: 'सत्ताधाऱ्यांसोबत बहुमताचा आकडा नसेल' सर्वेक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान, राज्यपालांवरही केली टीका

Maharashtra Politics: इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणावर शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे.
Sharad Pawar News in Marathi
Sharad Pawar News in Marathi Saam TV

Kolhapur: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा गाजत असून त्यावर राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली. कशाला काढायचा तो प्रश्न, असे म्हणत या वादावर पडदा टाकला आहे.

त्याचबरोबर इंडिया टुडेने सी-व्होटरच्या सहकार्याने 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणावरही त्यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. (Sharad Pawar)

Sharad Pawar News in Marathi
Ind Vs NZ 1St T20: अर्शदिपची धुलाई ते फ्लॉप फलंदाजी! Team India चा कोणी केला घात, पराभवाची 5 कारणे

सत्ताधाऱ्यांसोबत बहुमत नाही...

जनमत चाचणीचे आकडे समोर आले आहेत. ज्यामध्ये आत्ता निवडणूका झाल्यास भाजपाच्या जागा कमी होताना दिसत आहेत. यावर बोलताना शरद पवार यांनी  बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांच्यासोबत राहणार नाही, असं चित्रं या सर्व्हेतून स्पष्ट होत आहे, असे विधान केले आहे.

तो सर्वे मी वाचला देशात सत्ताधाऱ्यांविरोधात जनमत आहे. महाराष्ट्रातही सत्ताधाऱ्यांच्या हातात सत्ता राहील असे वाटत नाही, तसेच या एजन्सीचे पाच ते सहा वर्षापुर्वी केलेल्या सर्वेक्षणाचे आकडेही खरे ठरले होते, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar News in Marathi
Santosh Bangar News: आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ; प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विरोधकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न...

विरोधकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्वच पक्षांसोबत वाटाघाटी सुरू आहेत. परंतु स्थानिक पातळीवरील काही अडचणी आहेत. केरळमध्ये आम्ही डाव्यांसोबत आहोत. पण काँग्रेस आमचा विरोधक आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेससोबत आहोत. असे काही प्रश्न आहेत. त्यातून मार्ग काढायचा आहे. असेही शरद पवार म्हणाले.

त्याचबरोबर वंचित सोबत अजून आमची चर्चा झालेली नाही, मात्र राष्ट्रवादी, कॉग्रेस, शिवसेना (Shivsena) आम्ही सगळे एकत्र जाणार अशी आमची भूमिका आहे, असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com