Maharashtra Politics : २०२४ पर्यंत शरद पवार आमच्यासोबत येतील; भाजपच्या महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा दावा

Sharad Pawar-Chandrashekhar Bawankule : २०२४ पर्यंत पवार हे आमच्यासोबत येतील असा विश्वास वाटतो, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Sharad Pawar Marathi Batmya
Sharad Pawar Marathi Batmya SAAM TV

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar Political News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण दिग्गज नेते शरद पवार यांच्या अवतीभोवती फिरत आहे. त्याचवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांबाबत मोठा दावा केला आहे. २०२४ पर्यंत पवार हे आमच्यासोबत येतील असा विश्वास वाटतो, असं ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक रणनीती याबाबत माहिती देतानाच, विरोधी पक्षांच्या नेत्यांवर, विशेषतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

Sharad Pawar Marathi Batmya
INDIA Mumbai Meeting : 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीचं कसं असेल नियोजन? ५ समित्यांकडे असणार महत्त्वाची जबाबदारी

भाजप नेतृत्वानं आगामी निवडणुकांमध्ये घराणेशाहीला चाप लावण्याचा विचार केला आहे. त्यावरही बावनकुळे यांनी भाष्य केलं. मी मुख्यमंत्री आणि माझा मुलगा मंत्री ही उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली पद्धत बंद व्हावी म्हणून निर्णय आहे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

लोकसभेच्या (Loksabha Nivadnuk) ४५ पेक्षा अधिक जागा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या २०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार आहे. लोकसभेच्या ४५ हून अधिक जागा निवडून आणणे म्हणजे नवीन लोक येणार, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

Sharad Pawar Marathi Batmya
Sanjay Raut News: 'जो जिंकेल त्याची जागा...'; राऊतांनी सांगितला मविआच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला

केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवला असून, याबाबतही बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. कॅगचा अहवाल म्हणजे घोटाळा नाही. ते एखाद्या कामासंदर्भात विचारणा करतात. त्यावर समर्पक, समाधानकारक माहिती दिल्यास गैरसमज दूर होतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

'मोदींच्या कामावर विश्वास ठेवून शरद पवार आमच्यासोबत येतील'

२०२४ पर्यंत शरद पवार हे आमच्यासोबत येतील असा विश्वास आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास बघून ते आमच्यासोबत येतील. आज ना उद्या मोदींच्या कामावर विश्वास ठेवून पवार आमच्यासोबत येतील. त्यांनी अनेकदा मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे, असं बावनकुळे म्हणाले.

तुमच्या माध्यमातून शरद पवार यांना विनंती आहे की, मोदींच्या विचारांना पाठिंबा देणाऱ्या अजितदादांसोबत या. २०२४ पर्यंत पवार यांचे मन आणि मतपरिवर्तन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन नेते भेटतात तेव्हा बातमी होणार. त्यांची कौटुंबिक बैठक आहे. ती व्हायला हवी. अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर आमचं काही म्हणणं नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

महाविकास आघाडीकडे निवडणुका जिंकण्यासाठी उमेदवार नाहीत. त्यामुळं कितीही बैठका घेतल्या तरी लोक मोदींनाच मते देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी विनंती केली आहे. लवकरच विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com