राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण, पाथरी पोलिसात गुन्हा दाखल

मोहम्मद सईद याच्यावर यापूर्वी ही अनेक गुन्हे दाखल आहेत. दुर्रानी यांच्यासोबत झालेल्या प्रकरणा नंतर पाथरी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण, पाथरी पोलिसात गुन्हा दाखल
राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण, पाथरी पोलिसात गुन्हा दाखलSaam TV

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी- हिंगोलीचे विधान परिषद सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबा जानी दुर्रानी (Babajani Durani) यांना आज मारहाण झाल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. जिल्ह्यातील पाथरी शहरातील कबरस्थान परिसर येथे आमदार बाबा जानी दुर्रानी आपल्या समर्थकांसह उभे असताना पाथरी शहरातील मोहम्मद सईद या इसमाने दुर्रानी यांच्यासोबत वाद घालत जोराने यांच्या श्रीमुखात लगावली, आज माझ्यासोबत रिव्हॉल्व्हर नाही, असली असती तर गोळ्या घालून ठार केले असते अशी धमकी ही त्याने दिली असल्याची तक्रार दुर्रानी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटलं आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण, पाथरी पोलिसात गुन्हा दाखल
आटपाडी प्रकरणात पडळकर आणि पाटलांचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक?

मोहम्मद सईद याच्यावर यापूर्वी ही अनेक गुन्हे दाखल आहेत. दुर्रानी यांच्यासोबत झालेल्या प्रकरणा नंतर पाथरी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर व्यापाऱ्यांकडून पाथरी बंदची हाक देण्यात आली आहे . मात्र आमदार दुर्रानी यांनी बंद न करण्याचे आवाहन केले असून शांतता ठेवण्याचेही दुर्रानी यांनी आवाहन केले. दरम्यान, आरोपी मोहम्मद बिन सईद याला पाथरी पोलिसांनी अटक केली असून त्याआरोपी विरोधात पाथरी पोलिस ठाण्यात कलम 294, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार दुर्रानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या या आरोपीला तात्काळ हद्दपार करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com