Hingoli | महाराजांच्या पुतळ्यावर चढून घातला हार... (पहा व्हिडिओ)

हिंगोली जिल्ह्यात वसमत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला
Hingoli | महाराजांच्या पुतळ्यावर चढून घातला हार... (पहा व्हिडिओ)
Hingoli | महाराजांच्या पुतळ्यावर चढून घातला हार... (पहा व्हिडिओ)Saam Tv

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात Hingoli वसमत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. शहरात महाराजांच्या पुतळ्याच आगमन करण्यात आले आहे. यावेळी वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी पुतळ्याच स्वागत करत असताना, चक्क महाराजांच्या पुतळ्यावर चढून, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला आहे.

पहा व्हिडिओ-

हा हार घालत असलेला व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुतळ्यावर चढून हार घालण्याच्या राजू नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरांमधून निषेध होत आहे. परंतू, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आणि समाज माध्यमांमध्ये असलेल्या प्रतिक्रियांवर राजू नवघरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे.

Hingoli | महाराजांच्या पुतळ्यावर चढून घातला हार... (पहा व्हिडिओ)
चित्रा वाघांच्या ट्वीटमधील 'रावण' कोण आणि 'शूर्पणखा' कोण...

कधीही मोठेपणासाठी कोणते काम केले नाही. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मला माफ करा. असे म्हणत प्रकरण संपवण्याची विनंती त्यांनी यावेळी केली आहे. विशेष म्हणजे ते बोलत असताना नवघरे यांनी आपली चूक झाली असेल, तर आपल्याला फासावर लटकवा असेही देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.